हलकर्णी महाविद्यालयाला पॉवरलिफ्टिंगमध्ये चॅम्पियनशिप - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2018

हलकर्णी महाविद्यालयाला पॉवरलिफ्टिंगमध्ये चॅम्पियनशिप

शिवाजी विद्यापीठ इंटरझोनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चॅपिंयनशिप मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्यासह प्राध्यापक व मार्गदर्शक.

चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील खेळाडूंनी देवचंद कॉलेज अर्जुननगर (निपाणी) येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ इंटरझोनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत एकुण सात पदके मिळवून चॅम्पियनशिप मिळवली. महाविद्यालयातील विद्यार्थी स्वप्नील परशराम पाटील (कास्य पदक) कु. संजिवनी महादेव कांबळे (सुवर्णपदक ), कु. सोनाली सुभाष पाटील (रौप्य पदक), कु. स्नेहल शशिकांत बेनके (रौप्यपदक), कु. ऋतुजा मारुती पेडणेकर (रौप्यपदक), कु. नम्रता ज्ञानेश्वर पाटील (कास्य पदक), कु. करूणा शिवाजी होणगेकर (कास्य पदक) मिळवून महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली आहे. या खेळाडूंना प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर, जिमखाना प्रमुख प्रा. मनोहर तायडे, प्रा. व्ही. व्ही. पाटील आदीचे मार्गदर्शन लाभले.