![]() |
स्नेहल पाटील |
कागल जवाहर
नवोदय विद्यालयात आठवीमध्ये शिकत असलेल्या स्नेहल अशोक पाटील (रा. कुरणी, ता.
चंदगड) हिला राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेमध्ये ब्रॉझ पदक मिळाले. जवाहर नवोदय
विद्यालयामार्फत `भोपाळ` येथे राष्ट्रीय ज्युदो स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेमध्ये तिला ब्रॉझ मिळाले आहे. क्रिडाशिक्षक शुभांगी नागराळे, प्रशिक्षक
अनिकेत देवधर, प्राचार्य श्रीनिवास राव, उपप्राचार्य ॲन्सी जॉर्ज, आई अश्विनी
पाटील, अशोक पाटील यांचा प्रोत्साहन लाभले.