हलकर्णी फाट्यावर दारु दुकानांना परवाना न देण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2018

हलकर्णी फाट्यावर दारु दुकानांना परवाना न देण्याची मागणी


तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असेलेल्या हलकर्णी (ता. चंदगड) येथे नवीन बीअर बार व देशी दारु दुकानांना परवानगी देवू नये अशी मागणी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संदिप नांदवडेकर यांनी निवेदनाद्वारे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्याकडे केली आहे. हलकर्णी फाट्यावर वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळा, इंग्लिश मेडियम स्कुल, खासगी क्लासेसमध्ये सुमारे हजाराहून अधिक विद्यार्थ्यी दररोज ये-जा करत असतात. या फाट्यावर वेगवेगळी दुकाने असल्याने परिसरातील दहा-पंधरा गावातील लोकांची दररोज दर्ळ असते. त्यामुळे भावी पिढीला व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी नवीन बीअर बार व देशी दारु दुकानांना परवानगी देवू नये अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.