चंदगड येथे हुमणी मार्गदर्शन कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2018

चंदगड येथे हुमणी मार्गदर्शन कार्यशाळा

राज्य सरकारच्या कृषि विभाग तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका कृषी विभागामार्फत हुमणी नियंत्रण या विषयाचे प्रशिक्षण कार्यशाळा चंदगड येथे घेण्यात आली. तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षणाला उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार कदम यांनी कृषी विभागातील योजनांची माहीती दिली. एम. व्ही. लाटकर यांनी मृदा आरोग्य पत्रिकाबाबत माहीती दिली. अखिल भारतीय हुमणी किड नियंत्रण प्रकल्प शास्त्रज्ञ प्रा. डॉ. पांडुरंग मोहिते यांनी शेतकऱ्यांना हुमणी किडीच्या मुळ चार अवस्था असून त्यापैकी आपल्याकडे माणवरती व नदीकाठच्या अशा दोन प्रकरच्या हुमणी आहेत. हुमणीच्या अनेक प्रजाची असून त्यांची वाढ होण्याची अवस्था साधारणपणे सारखी असते. भोंगा या अवस्थेमध्ये असताना प्रामुख्याने सर्व गोळा करुन ते किटक नाशकांच्या पाण्यात टाकून नष्ट करणे, विविध प्रकारच्या किटकनाशांची आळवणी पिकांच्या मुळांजवळ किंवा पाण्याद्वारे केल्यास अळी नष्ट करता येते. एकात्मिक किड नियंत्रण पध्दतीने सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकचवेळी पिकबदल उपाय करुन पिकांचे नुकसान टाळता येत असल्याचे सांगितले. यावेळी अभिजित दावणे उपस्थित होते. दिपक कांबळे यांनी सुत्रसंचालन केले. एस. डी. गुटवड यांनी आभार मानले.