अतिक्रमणमुक्त पाणंद रस्ते गावच्या विकासातील भागीदार – तहसिलदार शिवाजी शिंदे - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2018

अतिक्रमणमुक्त पाणंद रस्ते गावच्या विकासातील भागीदार – तहसिलदार शिवाजी शिंदे

डुक्करवाडी (ता. चंदगड) येथे पालकमंत्री पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त योजनेतून पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणमुक्त करताना तहसिलदार शिवाजी शिंदे, मंडल अधिकारी राजश्री पचंडी, सरपंच राजु शिवनगेकर, नंदकुमार ढेरे 
अतिक्रमण केल्यामुळे सर्वानाच गावच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे विकास खुंटतो. वाड्या-वस्त्या डोंगर दऱ्याकडे जाणारे रस्ते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवतात. त्यामुळे अतिक्रमणमुक्त मोकळे रस्ते प्रत्येक नागरीकाला आवश्यक आहेत. गावच्या पाणंद रस्त्यावर अतिक्रमण करु नये. गावाच्या सभोवताली असलेले अतिक्रमणमुक्त पाणंद रस्ते हे त्या गावच्या विकासातील भागीदार असतात असे प्रतिपादन तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी केले. डुक्करवाडी-रामपूर (ता. चंदगड) येथे पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पाणंद रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच राजू शिवनगेकर होते.
यावेळी मंडळ अधिकारी राजश्री पचंडी यांनी सरकारच्या योजना या शेतकऱ्यासाठी असतात. त्यामुळे सर्वानीच चार-दोन फुटासाठी अतिक्रमण करुन गावच्या रोषाला सामोरे जाण्यापेक्षा अतिक्रमण न केलेलेच बरे असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. यावेळी शंकरदेव ते बजुर्ग खिंड सोनावरवाडीपर्यंच्या पाणंद रस्त्याच्या दुतर्फा शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण काढून 120 रस्ता तयार करण्यात आला. प्रास्ताविक बाबुराव वरपे यांनी केले. तलाठी शरद नाकाडी, राघोबा वरपे, यमनाप्पा वरपे, नारायण साबळे, द. ना. नाईक, तानाजी कांबळे, जनार्दन सुतार, गुंडु माने, सुनिल देवणे, विलास गावडे, संजय अर्जुनवाडकर, प्रकाश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. विलास नाईक यांनी सुत्रसंचालन केले. आर. व्ही. ढेरे यांनी आभार मानले.