नांदवडे येथे दिपावलीनिमित्त कब्बडी स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2018

नांदवडे येथे दिपावलीनिमित्त कब्बडी स्पर्धेचे आयोजन


नांदवडे (ता. चंदगड) येथील भिमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने दिपावलीनिमित्त 10 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी सात वाजता खुल्या कब्बडी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. याच दिवशी दुपारी तीन वाजता हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी 1101 रुपये प्रवेश शुल्क असून विजेत्यांना अनुक्रमे 15001, 11001, 7001 यासह भिमशक्ती चषक दिला जाणार आहे. बेस्ट राईडर व बेस्ट पकडसाठी वैयक्तिक प्रत्येकी 501 रुपये व भिमशक्ती चषक देण्यात येणार आहे. उद्योजक व नेते रमेशराव रेडेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. सामाजिक कार्यकर्ते ड. संतोष मळविकर अध्यक्षस्थानी असतील.
कार्यक्रमाला तालुका संघाचे चेअरमन राजेश पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, जिल्हा संघटक संग्राम कुपेकर, सह. संपर्क प्रमुख सुनिल शिंत्रे, गोकुळचे संचालक दिपक पाटील, भारीत तालुकाध्यक्ष पी. आर. देशमुख, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, उद्योगक सुनिल काणेकर, सुरेश सातवणेकर, ठेकेदार विलास पाटील, विस्तार अधिकारी आर. पी. कांबळे, सभापती बबन देसाई, शिवसेना महिला संघटिका सौ. संज्योती मळवीकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, दुध संस्था चेअरमन व सदस्य उपस्थित रहाणार आहेत. याचबरोबर कृतीशील मुख्याध्यापक म्हणून आर. आय. पाटील, पी. एच. डी. प्राप्त केल्याबद्दल प्रा. डॉ. सुरेश कांबळे, सेवानिवृत्त सैनिक अर्जून गावडे यांच्यासह प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी राजेंद्र कांबळे (8390102510), ज्ञानोबा कांबळे (8308855699) व सुरेश कांबळे (9552238695) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे.