चंदगड तालुका संघाला सहकार भूषण पुरस्कार, मुंबईत सहकार मंत्र्यांच्या हस्ते वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2018

चंदगड तालुका संघाला सहकार भूषण पुरस्कार, मुंबईत सहकार मंत्र्यांच्या हस्ते वितरण

मुंबई येथे सहकार भूषण पुरस्कार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते स्विकारताना तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील, व्यवस्थापक एस वाय पाटील, तानाजी गडकरी, अभय देसाई, अरुण काकडे व संचालक मंडळ.

चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाला राज्य सरकारचा सहकार क्षेत्रातील मानाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाला. मुंबई येथे रंगशारदा सभागृहात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते संघाचे अध्यक्ष राजेश पाटील, व्यवस्थापक एस. वाय. पाटील व संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला. रोख 51 हजार स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर संघाच्या अध्यक्ष राजेश पाटील यांनी ``तालुका संघाला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचा हा सन्मान आहे. तालुका संघाने व्यवसाय वृद्धि साठी आधुनिक काळाबरोबर व्यवसाय वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सभासदांच्या सहकार्यामुळेच संघ पुरस्कारापर्यंत पोहोचू शकला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.`` यावेळी आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार जयंतभाई पाटील, सहकार सचिव श्री. शुक्ला, सहकार आयुक्त सतीश सोनी, साखर आयुक्त संभाजी पाटील, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, उपाध्यक्ष पोमानी पाटील, तानाजी गडकरी, अभय अडकुडकर, परसु पाटील, गोपाळ गावडे, अली मुल्ला आदीसह संचालक व सहकारी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.