![]() |
| ढोलगरवाडी (ता. चंदगड) येेथील मामासाहेब लाड विद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शन नियोजन बैठकीवेळी चर्चा करताना गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार व इतर शिक्षक. |
कालकुंद्री
/ प्रतिनिधी
चंदगड
तालुकास्तरीय 44 वे विज्ञान प्रदर्शन 2018 भरविण्याचा
मान यावर्षी मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील शाळेला देण्यात
आला आहे. ढोलगरवाडी येथे नुकत्याच गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन बैठकीत ही अधिकृत घोषणा झाली. हे
साहित्य संमेलन 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
तीन दिवस
सर्पमित्र 'बाबुराव टक्केकर विज्ञान नगरीत 'संपन्न
होणाऱ्या प्रदर्शन काळात तालुक्यातील सर्पप्रेमी व विद्यार्थ्यांना सर्व
प्रकारच्या सापांबद्दलची शास्त्रोक्त माहिती प्रात्यक्षिकाद्वारे घेण्याची अपूर्व
संधी मिळणार आहे. प्रदर्शनात प्राथमिक,
माध्यमिक विद्यार्थ्यांची वैज्ञानिक साधने, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची
शैक्षणिक साधने, लोकसंख्याविषयक साधने, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची वैज्ञानिक
उपकरणे, प्रश्नमंजुषा हे सर्व विभाग असतील. प्रदर्शनाचे
उद्घाटन आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते होईल. तहसीलदार शिवाजीराव
शिंदे यांच्यासह पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, जि. प. सदस्य व मान्यवरांच्या उपस्थित रहाणार
आहेत. संस्था उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी हे प्रदर्शन उत्कृष्ट नियोजनासह
यशस्वी करू असा विश्वास चंदगड लाईव्ह न्युज चॅनेलचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केला. नियोजन
बैठकीस गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर.
पाटील, केंद्रप्रमुख
के. आय. पाटील, एम. टी.
कांबळे, विलास कांबळे, वाय. आर. निटूरकर, वाय. के. चौधरी, एस. के.
सावंत, जी. बी. जगताप, टी. एस. सुतार, प्रा. सदाशिव पाटील आदींची उपस्थिती
होती.


No comments:
Post a Comment