![]() |
हलकर्णी (ता. चंदगड) येथे मुख्याध्यापक अशोक बेनके यांच्याकडे गॅस सिलेंडरचे वितरण करताना सरपंच एकनाथ कांबळे ग्रामसेवक दयानंद मोटूरे आदि मान्यवर. |
अडकूर / प्रतिनिधी
केंद्रीय प्राथमिक शाळा अडकूर (ता. चंदगड) येथे तिसरी शिक्षण परिषद झाली. या परिषदेमध्ये हलकर्णी ग्रामपंचायतीकडून परिसरातील
शाळाना गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामराव
पाटील होते.
यावेळी सरपंच एकनाथ कांबळे, ग्रामसेवक
दयानंद मोटूरे यांच्या हस्ते दौलत प्राथमिक शाळा, केंद्रीय प्राथमिक शाळा हलकर्णी, नाईक वस्ती या शाळांना दोन गॅस सिलेंडर
व एक शेगडीचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक अशोक बेनके, सौ.
शितल चाळूचे, संभाजी खनगुतकर याबरोबरच शाळा व्यवस्थापन समिती
अध्यक्ष दशरथ नाईक, उपाध्यक्ष सौ. अंजली जोशी, प्रतिक्षा
सावंत, नरसू नाईक, गुंडू तुडयेकर
अरूण दळवी, सुजाता कांबळे, मनोहर पाटील, सुर्यकांत
सावंत आदि मान्यवर उपस्थित होते. दुपारच्या सत्रात केंह प्रमुख वाय. के. चौधरी, मलिक
शेख यानी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बेनके यानी
केले. सूत्रसंचालन सुभाष चांदिलकर यानी केले. आभार अर्जून चाळूचे यानी मानले.
No comments:
Post a Comment