दौलतच्या जमीन विक्रीला ग्राहकांनी प्रतिसाद देऊ नये - अॅड. संतोष मळवीकर - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2018

दौलतच्या जमीन विक्रीला ग्राहकांनी प्रतिसाद देऊ नये - अॅड. संतोष मळवीकर

अॅड. संतोष मळवीकर

दौलत हलकणी / प्रतिनिधी
शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगांराची देणी देण्यासाठी प्रशासनाने चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखान्याच्या जमीण विक्रीसाठीचा जाहीर लिलाव उद्या ७ डिसेंबर 2018 रोजी होणार आहे. चंदगडच्या शेतकऱ्यांची अस्मिता असेलल्या दौलतच्या जमीन घेण्यासाठी कोणीही ग्राहकाने हजर राहु नये. असे आवाहन दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष अॅड. संतोष मळवीकर यांनी केले आहे.
दौलत कारखान्याची जमीन ही शेतकरी सभासदांची हक्काची जमीण असुन तीच विकुण त्याच शेतकऱ्यांची देणी द्यायची हे चुकीचे आहे. साखर आयुक्त यांच्या आदेशाने चंदगडचे तहसिलदार यांनी दौलतची जमीन विक्री करुण शेतकऱ्यांची देणी देण्याची नोटीस काढली आहे. त्याच आदेशाद्वारे शुक्रवारी ७ रोजी दौलतच्या जमीनीचा लिलाव होणार आहे. या अगोदर सभासद शेतकरी,  कामगार यांनी जमीन विक्रीला विरोध केला आहे. तोंडी व लेखी सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. पण प्रशासन कायद्याप्रमाणे कारवाई करत असल्याने दौलतच्या जमीन विक्रीला कोणीच प्रतिसाद देऊ नये. असेही आवाहन करण्यात आले आहे. यावेळी प्रदिप पवार, राजेंद्र पाऊसकर, यांच्यासह सदस्य उपस्थित होते.


No comments:

Post a Comment