![]() |
चंदगड आगाराची खिळखिळी झालेली बस. (शहानुर फोटो, कोवाड) |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड
आगारातील जुन्या बसचा खुळखुळा झाला असून प्रवाशांना इंजिनच्या आवाजापेक्षा बसच्या
काचा व पत्र्याचा कर्कश आवाज येत होता. त्यामुळे प्रवाशांना हा आवाज सहन करतच प्रवास
करावा लागला. त्यामुळे चंदगड आगारप्रमुख यांनी याकडे लक्ष देवून जु्न्या गाड्या बदलाव्यात अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
चंदगड आगाराची चंदगड-कोवाड-दड्डी (क्र. एम. एच. 20,
डी. 9034) या गाडीचा समोरील भाग हलता होता. पत्रे एकमेकाला लागून मोठा आवाज येत
होता. बसचा समोरील भाग खिळखिळा झाला होता. तसेच संपुर्ण बॉडीचा देखील
प्रवासादरम्यान आवाज येत होता. या बसमध्ये बसल्यानंतर साक्षात रणगाड्यावर बसल्याचा
भास होत होता. या गाडीप्रमाणे चंदगड आगारामध्ये आणखी गाड्या असून त्या बदलाव्यात
अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे. वाढता तिकीट दर व चंदगड आगाराकडून रस्त्यावर
धावणाऱ्या जुनाट बस, त्यामुळे होणारी गैरसोय. यामुळे प्रवाशांतून नाराजीचा सुर
आहे.
No comments:
Post a Comment