![]() |
| अब्दुलसत्तार अब्बास मुल्ला |
चंदगड / प्रतिनिधी
ऑल इंडिया मुस्लिम ओ. बी. सी. ऑर्गनायझेशनच्या तालुकाध्यक्षपदी
चंदगड शहर मुस्लिम समाज माजी अध्यक्ष अ. सत्तार उर्फ आबुल आब्बास मुल्ला यांची निवड
झाली आहे. निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष रफिक हरूनसो शेख यांनी दिले आहे. समाजाच्या
प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल वरीष्ठांनी घेऊण हे पद दिल्याचे मुल्ला यांनी सागितले.
या निवडीमुळे तालुक्यातील समाजामध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
या निवडीबद्दल अंजुमन-ए-इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट
चंदगड, अमाल फौउंडेशन,
जमीयत उलेमा हिंद चंदगड व मुस्लिम समाज चंदगड तालुका यांचे वतीने त्यांना शुभेच्छा
देण्यात आल्या. यावेळी अंजुमनचे अध्यक्ष तजमुल फणीबंद, इस्माईल मुल्ला, हिदायत नाईक, सलीम नाईक, आब्बास अली नाईक, फारुक नाईक, शब्बीर बेपारी, रमजान नेसरीकर, सलाउद्दीन सय्यद उपस्थित होते.
![]() |
| अब्दुलसत्तार मुल्ला यांचा सत्कार करताना समाज बांधव. |


No comments:
Post a Comment