![]() |
| बाबासाहेब मुल्ला |
चंदगड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील पत्रकार बाबासाहेब मुल्ला यांची ऑल इंडिया मुस्लीम ओ. बी. सी. ऑर्गनाइझेशनच्या सरचिटणीस पदासाठी निवड झाली आहे. याबाबत नुकताच त्यांना एका पत्राद्वारे त्यांना कळविण्यात आले आहे. मुल्ला हे पत्रकार असुन चंदगड तालुका पत्रकार संघ, जिल्हा पत्रकार व मराठी पत्रकार परिषदचे सभासद आहेत. तालुक्यातील मुस्लीम समाजासाठी तळमळीने ते कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


No comments:
Post a Comment