कोवाड येथे मराठा आरक्षण विजयी मेळावा व शहीदांना श्रद्धांजली - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2018

कोवाड येथे मराठा आरक्षण विजयी मेळावा व शहीदांना श्रद्धांजली


कोवाड (ता. चंदगड) येथे सकल मराठा क्रांती मोर्चा व मराठा कृती समिती चंदगड यांच्या वतीने आयोजित विजयी मेळाव्यातील उपस्थित मराठा बांधव व कार्यकर्ते.
कोवाड / प्रतिनिधी
सकल मराठा समाज (ठोक मोर्चा) व मराठा कृती समिती चंदगड यांच्या वतीने कोवाड (ता. चंदगड) येथील शिवाजी महाराज चौकात प्राथमिक मराठा समाज आरक्षण विजयी मेळावा आणि शहिदांना  श्रद्धांजली असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चंदगड तालुक्यातील हजारो मराठी बांधव उपस्थित होते. यावेळी साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
प्रास्ताविक गोविंद पाटील यांनी केले. यानंतर या मोर्चामध्ये बळी पडलेल्या 40 हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मोठ्या प्रमाणात कष्ठ करून हे आंदोलन यशस्वी केले असून यामध्ये मिळालेल्या आरक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा. दिपक पाटील, दयानंद सलाम, राजू पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी सचिन पाटील, गुलाब पाटील, गजानन पाटील, कल्लाप्पा वांद्रे,  रामा व्हन्याळकर, काशीनाथ जाधव, विक्रम पेडणेकर, विवेक पाटील, कृष्णा बिर्जे,  प्रा. आर. टी. पाटीलविश्वनाथ पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आभार राजाराम भोगण यांनी मानले.

टीप - बातमीचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी कृपया आमच्या chandgad live news या YouTube चॅनेल ला भेट द्या. 

No comments:

Post a Comment