![]() |
| कृषी सहाय्यक एस. डी. खुटवड |
अडकूर / प्रतिनिधी
आज विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात मानवाने
प्रचंड प्रगती केली आहे. आपल्याकडे ज्ञान प्रचंड आहे. पण त्या ज्ञानाचा आस्वाद योग्य पद्धतीने घेता येत नाही. अमूल्य
असणाऱ्या या ज्ञानाचा मकरंद जर सेवन करायचा असेल तर प्रत्येक माणवाने सातशे वर्षाची
परंपरा असणाऱ्या संतांची संगत करायला हवी. असे विचार कृषी
सहाय्यक एस. डी. खुटवड यानी
व्यक्त केले. मौजे तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे श्री
ज्ञानेश्वरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात
आले आहे. यावेळी संतांचे संगती या विषयावर
ते बोलत होते.
श्री. खुटवड म्हणाले, माणसाने
प्रचंड प्रगती केली. मोबाईल क्रांतीमुळे जगातील सर्व गोष्टी क्षणात समजतात. पण
शेजारच्या घरात काय घडले ते समजत नाही. तंत्रज्ञानामूळे माणूस जवळ आला आहे पण
माणूसकी हरवली आहे. ती जर मिळवायची असेल तर संतांची संगत करायला हवी. सातशे
वर्षाची परंपरा असणारा वारकरी संप्रदाय जगात सर्वत्रेष्ठ आहे. पण आता यावरही
बाजारू संतांचे आक्रमण होत आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा यासाठी अंतःकरण शुद्ध
करण्यासाठी संतांची संगत करण्याचा सल्ला त्यानी उपस्थिताना दिला. या कार्यक्रमाला
हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment