![]() |
| माडवळे (ता. चंदगड) येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधताना हलकर्णी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी. |
दौलत हलकर्णी
माडवळे (ता. चंदगड) गावाशेजारी हलकर्णी येथील
गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय
मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत विद्यार्थ्यींनी श्रमदानातून वनराई
बधांरा बांधला. महाराष्ट् शासन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरच्या राष्ट्रीय सेवा
योजनेच्या जलसंधारन उपक्रमातंर्गत हा कार्यकम माडवळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या
सहकार्याने घेण्यात आला.
कामाचा शुभांरभ गावचे सरपंच गगांधर गावडे यांच्या
हस्ते झाला. स्थानिक लोकांची गरज विचारात घेऊण हे बधांऱ्याचे काम पुर्ण करण्यात
आले. गावातील पाळीव जनावरांच्याबरोबर पशुपक्षी यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न
काही दिवसतरी निकाली निघाला आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. मधुकर
जाधव, प्रा. एम. एन. कुचेकर व विद्यार्थी
स्वयंमसेवक यानी कार्यक्रमाचे नियोजन केले. जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, संस्थेचे सचिव विशाल पाटील, प्राचार्य पी. वाय. निंबाळकर यांचे मार्गदर्शन व
प्रोत्साहन लाभले. यावेळी उपसरपंच नामदेव सुतार,
ग्रामसेवक एस. एस. साखरे, पंचायत
समिती सदस्य एन. टी. गावडे, गुरुकुल इग्रंजी स्कुलचे संस्थापक शिवाजी
सुभेदार, अमृत मसुरकर, गोपाळ काबंळे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. स्वंयसेवक सागर
चिखलकर यांनी सर्वांचे आभार मानले.


No comments:
Post a Comment