कळसगादेचे अशोक दळवी यांनी शाळेतील दोन मुले घेतली शैक्षणिक दत्तक - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2018

कळसगादेचे अशोक दळवी यांनी शाळेतील दोन मुले घेतली शैक्षणिक दत्तक

कळसगादे (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील दोन विद्यार्थ्यांना अशोक दळवी यांनी शैक्षणिक दत्तक घेतले. 
चंदगड / प्रतिनिधी
कळसगादे (ता. चंदगड) येथील अशोक दळवी यांनी सामाजिक जाणिवेतून कळसगादे येथील प्राथमिक शाळेतील दोन आर्थिकदृष्ट्या गरजु मुलांना शैक्षणिक दत्तक घेतले. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाची चिंता मिटली आहे. समाजातील दानशुर व्यक्तींनी यांचा आदर्श घेवून अशा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याची गरज आहे.
ज्या समाजातून आपण प्रगती करत आहोत. त्या समाजाचे आम्ही काहीतरी देणे लागतो. हा दृष्टीकोन बाळगून त्यांनी या मुलांना दत्तक घेतले आहे. श्री. दळवी हे एलआयसीचे विमा सल्लागार आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये अशोक दळवी यांना एल. आय. सी. मधील मानाचा `एम. डी. आर. टी.` अमेरिका हा पुरस्कार मिळाला आहे. ते कवितादेखील उत्तम करतात. त्याचा वसुंधरा हा काव्यसंग्रह देखील प्रकाशित झाला आहे. याचबरोबर लवकरच त्यांचे `ट्रॅक्टर ड्रायव्हर ते `एम. डी. आर. टी. अमेरिका` हे प्रेरणादायी पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.


No comments:

Post a Comment