तालुक्यातील सर्व गावात शाखा उभारणार – राज्य उपाध्यक्ष बाळेश नाईक - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2018

तालुक्यातील सर्व गावात शाखा उभारणार – राज्य उपाध्यक्ष बाळेश नाईक

बोजुर्डी (ता. चंदगड) येथे शाखा उद्गाटन प्रसंगी नरवीर उमाजी नाईक मडंळाचे राज्य उपाध्यक्ष बाळेश नाईक व इतर कार्यकर्ते.

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
समाज एकत्रीत राहीला तर कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो. त्यासाठी तालुक्यात सर्व गावात शाखाची उभारणी करुन समाजाला एकत्रीत करणार असल्याचे प्रतिपादन नरवीर उमाजी नाईक मडंळाचे राज्य उपाध्यक्ष बाळेश नाईक यांनी केले. बोजुर्डी (ता. चंदगड) येथील नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या शाखा उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी शाखा उद्घाटनानंतर श्री. नाईक यांनी समाजाविषयीची ध्येयधोरणे स्पष्ट करून एकजुटीने राहण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक शालेय कमिटीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण गुडवळेकर यांनी केले. यावेळी माजी सरपंच सौ. गुडवळेकर, लक्ष्मण नाईक, पाडुंरग नाईक, विजय नाईक, कार्तिक नाईक, मारुती नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आभार विनोद नाईक यांनी मानले.

No comments:

Post a Comment