![]() |
| आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड
विधानसभा मतदारसंघात रामोशी-बेरड समाजातील लोक 35 ठिकाणी वाड्या वस्त्यावर रहातात. ते रहात
असलेली ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही भौतिक सुविधा झाल्या
नाहीत. मूलभूत
हक्कापासून वंचित राहू नये. यासाठी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती
व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे केली होती.
त्यानुसार खालील गावासाठी निधी मंजूर झाला आहे.
डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील नाईक वस्ती नाईक
वस्तीमध्ये गटर बांधकामासाठी 10 लाख रूपये, जरळी (ता.
गडहिंग्लज) नाईक वस्तीमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण ५ लाख रुपये, गुडेवाडी (ता. चंदगड) नाईक वस्तीमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण ५ लाख
रुपये, दिंडलकोप (ता. चंदगड) नाईक वस्तीमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण ५ लाख रुपये, हलकर्णी
(ता. चंदगड) येथील पतवाचे माळ नाईक वस्ती रस्ता डांबरीकरण 5 लाख
अशा 30 लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांना मंजुरी मिळवण्यासाठी डॉ. नंदा बाभुळकर, राष्ट्रवादीचे
तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील, कल्लाप्पा भोगण, विलास नाईक, विलास पाटील, दत्तू अण्णा कडोलकर, नामदेव पाटील, संजय पाटील, शिवाजी सावंत या सर्वांनी प्रयत्न केले.


No comments:
Post a Comment