कार्वे येथे शुक्रवारी होणार ह. भ. प. शंकर मुरकुटे यांची पुण्यतिथी - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2018

कार्वे येथे शुक्रवारी होणार ह. भ. प. शंकर मुरकुटे यांची पुण्यतिथी



कारवे / प्रतिनिधी
मृदंग मनी ह. भ. प. शंकर यल्लाप्पा मुरकुटे यांच्या दहावे पुण्यस्मरण दिनी मजरे कारवे (ता. चंदगड) येथे विविध कार्यक्रमांचे शुक्रवार 7 डिसेंबर 2018 रोजी  कारवे येथील सुभाष पाटील यांच्या ' संत कृपा' निवासस्थानी आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता फोटो पूजन व आरती, दुपारी चार वाजता हरिपाठ, सायंकाळी सहा वाजता शंकर मुरकुटे यांचा जीवन परिचय व कार्यप्रणाली चे वाचन, संध्याकाळी सात वाजता ह. भ. प. डॉ. विश्वनाथ पाटील यांचे प्रवचनरात्री आठ वाजता महाप्रसादरात्री नऊ वाजता वेदांत केसरी व वैष्णव वारकरी ज्ञान भूषण सन्मानित महाराष्ट्र वारकरी महासंघ बेळगावचे अध्यक्ष ह. भ. प.  गुरुवर्य भाऊसाहेब पाटील महाराज शेकींन होसूर यांचे कीर्तन आयोजित केले आहे. ह भ प शंकर मुरकुटे यांचे शिष्यगन, संत भक्तजन व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मजरे कारवे येथील श्री हनुमान भजनी मंडळ व ग्रामस्थथ मंडळाने केले आहे. 


No comments:

Post a Comment