अरूण डोंगळे ट्रस्ट तर्फे गुरूवारी आजर्‍यात माजी सैनिक मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2018

अरूण डोंगळे ट्रस्ट तर्फे गुरूवारी आजर्‍यात माजी सैनिक मेळावा


आजरा / प्रतिनिधी
घोटवडे (ता. राधानगरी) येथील अरूण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गुरूवार 6 डिसेंबर 2018 रोजी माजी सैनिक मेळावा आयोजीत केला आहे. या मेळाव्यात वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिक तसेच स्वातंत्र्य सैनिक यांचा सन्मान करण्यात येणार आहे. गुरूवारी दुपारी एक वाजता हा कार्यक्रम आजरा येथील अण्णाभाऊ सभागृहात होणार आहे.

या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. हा सन्मान सोहळा खासदार धनंजय महाडीक यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रविंद्र आपटे असतील. गोकुळचे संचालक अरूण डोंगळे, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. जिल्हा परिषद सदस्य जयवंत शिंपी, आजर्‍याचे माजी सभापती विष्णूपंत केसरकर, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, गोकूळचे संचालक दीपक पाटीलराजेश पाटील, रामराजे कुपेकर, आजरा साखर संचालक मुकुंद देसाई, सभापती रचना होलम, उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे, आजरा बँक अध्यक्ष दीपक सातोस्कर, काँग्रेस तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर, जनता बँकेचे माजी अध्यक्ष श्रीपतराव देसाई, नगरसेवक विलास नाईक, संभाजी पाटील, संजय सावंत हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन अरूण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट, आजरा तालुका माजी सैनिक वेल्फेअर फौंडेशन व आजरा तालुका माजी सैनिक पतसंस्था यांच्या वतीने केले आहे.


No comments:

Post a Comment