![]() |
आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर |
चंदगड / प्रतिनिधी
मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील शहीद जवान
राजेंद्र तुपारे यांच्या अंत्यविधी समयी जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकातदादा
पाटील यांनी सरकारकडून शहीद तुपारे यांचे कुटुंबियांना पंधरा लाखांची सरकारी मदत
जाहीर केलेली होती. परंतु याला दोन वर्षे उलटली तरी मदत मिळाली नाही. हि बाब आमदार
संध्यादेवी कुपेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास पत्राद्वारे
आणून दिली. त्यावेळी त्यांनी संबंधीत विभागास तात्काळ मदत देणे बद्द्लचे आदेश दिले.
कार्वे (ता. चंदगड) येथील राजेंद्र तुपारे हे
भारतीय सैन दलामध्ये 14 वर्षे कार्यरत होते. 6/11/2016 रोजी पाकिस्तानी सैन
दलाकडून झालेल्या गोळीबारात राजेंद्र तुपारे हे शहीद झाले. 8/11/2016 रोजी शहीद
राजेंद्र तुपारे यांचेवर शासकीय इतमामात कार्वे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या
प्रसंगी पालक मंत्री यांनी 15 लाखांची मदत जाहीर केली होती. याला दोन वर्षापेक्षा
अधिक कालावधी झाला. त्यामुळे आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी त्यांनी संबंधीत विभागास
तात्काळ मदत देणे बद्द्लचे आदेश दिले. तसेच यावेळी असेही सुचीत केले की, आर्थिक
मदतीची मर्यादा वाढविणेचे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री यांच्या भेटीमुळे
शहीद तुपारे कुटुंबियांना सरकारी मदत मिळणेचे कामाला गती आलेली आहे.
मजरे कारवे येथील शहीद
जवान वेल्फेअर फौंडेशन मार्फत कार्वे येथे शहीद जवानांच्या नावे भव्य असे स्वागत
कमान उभारणीचे काम सुरू आहे. या स्वागत कमानीच्या पायाभरणी शुभारंभ प्रसंगी शहीद
जवान वेलफेयर फौउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी ही बाब आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर
यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास
आणून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले होते.
No comments:
Post a Comment