मी यशस्वी होणार हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा – आगार प्रमुख श्री. हवालदार - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2018

मी यशस्वी होणार हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा – आगार प्रमुख श्री. हवालदार

 येथील श्रीमान व्ही. पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालयातील लिपिक राजाराम पाटील यांचा सत्कार करताना आगार प्रमुख विजय हवालदार, शेजारी प्राचार्य ए. एस. पाटील व इतर

कोवाड / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी करिअरच्या दिशा ठरवताना मी अधिकारी होणार यापेक्षाही मी यशस्वी होणार हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास भवितव्य उज्ज्वल होईल असे प्रतिपादन चंदगड आगार प्रमुख विजय हवालदार यांनी केले. कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीमानी व्ही. पी. देसाई  उच्च माध्यमिक विद्यालयात अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत एस. टी. पास वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. एस. पाटील होते. वाहतूक निरीक्षक देवेंद्र शेट्टी प्रमुख उपस्थित होते.
उपप्राचार्य एस. डी. सावंत यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक एम. एन. मनगुतकर यांनी स्वागत केले. यावेळी विद्यालयाच्या वतीने आगार प्रमुख श्री. हवालदार व वाहतूक निरीक्षक श्री. शेट्टी यांचा प्राचार्य ए. एस. पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आगार प्रमुख श्री. हवालदार यांच्या हस्ते चारशे मुलींना मोफत पासचे वितरण झाले. अनेक वर्षापासून रेंगाळलेला कोवाड ते दद्डी या बसचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल चिंचणे व कामेवाडी येथील विद्यार्थिनींनी श्री. हवालदार यांचा सत्कार केला.
आगारप्रमुख श्री. हवालदार म्हणाले, ``अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना ही लाखो मुलींना वरदान ठरली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना एसटी महामंडळाकडून त्रैमासिक मोफत पास दिला जातो. यामुळे मुलींना आपल्या आवडीच्या ठिकाणी व दर्जेदार शाळेत शिक्षण घेणे सुलभ झाले आहे. प्रवास खर्चाअभावी अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलींनी याचा लाभ घ्यावा असे सांगून श्री. हवालदार म्हणाले,``शिक्षण वेगवान झाले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर कष्ट करणे गरजेचे आहे. मन लावून सखोल अभ्यास केल्यास व शिक्षणात गोडी निर्माण केल्यास यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येणार आहे. त्यासाठी मी यशस्वी होणार हाच विचार मनात ठेवून वाटचाल करावी असा सल्ला त्यांनी दिला. प्राचार्य श्री. पाटील यांनी मोफत पास मुळे विद्यालयातील 400 मुलींना याचा लाभ झाल्याचे सांगून कोवाड भागातील बससेवा सुरळीत केल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना याचा फायदा झाल्याचे सांगितले. यावेळी प्रा. ए. टी. पाटील कपील मुंडे, देवेंद्र शेट्टी यांनी मनोगते व्यक्त केली. राजेश्वर जाधव, प्रा. एस. एम. माने, प्रा. एम. बी. नाईक, प्रा. के. एम. तेऊरवाडकर, प्रा. एस. एच. पाटील, प्रा. एस. एस. खवणेवाडकर उपस्थित होते. प्रा. एस. टी. कदम यांनी सुत्रसंचालन केले. पर्यवेक्षक एम. एन. मनगुतकर यांनी आभार मानले.

                                 विशेष सत्कार
विद्यालयातील प्रिया इंगवले, सोनाली पाटील व अश्विनी फोंडे या गरीब विद्यार्थिनींना वर्षभर पाससाठी आर्थिक मदत केल्याबद्दल उपप्राचार्य एस. डी. सावंत, प्रा. एस. एम. माने यांचा व अश्विनी फोंडे या मुलीचा दोन वर्षाचा शैक्षणिक खर्च उचलल्याबद्दल लिपिक राजाराम पाटील यांचा आगारप्रमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




No comments:

Post a Comment