ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सिकंदर नाईक यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2018

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सिकंदर नाईक यांची निवड

सिकंदर मुस्ताक नाईक


चंदगड / प्रतिनिधी
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी चंदगड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सिकंदर मुस्ताक नाईक यांची निवड झाली आहे. निवडीचे पत्र नुकतचे जिल्हाध्यक्ष रफिक हारून शेख यांनी दिले. समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या विविध आंदोलनाची व युवा वर्गासाठी केलेल्या कामाची दखल घेत ही निवड झाली. या निवडीबद्दल अंजुमन-ए-इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चंदगड, अमल फाउंडेशन, जमीयत उलेमा हिंद चंदगड व मुस्लिम समाज चंदगड तालुका यांचे वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.




No comments:

Post a Comment