अडकूर- सत्तेवाडी मार्गावर काजू झाडांच्या फांद्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2018

अडकूर- सत्तेवाडी मार्गावर काजू झाडांच्या फांद्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ

अडकूर - सत्तेवाडी मार्गावर रस्त्यावर आलेल्या काजुच्या झाडांच्या फांद्या.  

अडकूर / प्रतिनिधी
अडकूर ते सत्तेवाडी (ता. चंदगड) या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काजू झाडांचे अतिक्रमण झाले आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकाना लहान मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामूळे रस्त्यावर काजू झाडांच्या फांद्या आल्यामुळे समोरुन येणारी वाहने न दिसल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे या काजू झाडांच्या फांद्या त्वरीत तोडाव्यात अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
या मार्गावर मोठया प्रमाणात काजूच्या बागा आहेत. परिसरातील जवळपास सर्वच शेतकरी काजू पिक घेतात. अडकूरहून-इब्राहिमपूरकडे जाताना सत्तेवाडीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा काजूची झाडे वाढल्याने फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. दोन्ही बाजूनी काजूच्या फांद्याच-फांदया आल्याने काही ठिकाणी केवळ सहा-सात फूटांचाच रस्ता शिल्लक राहिला आहे. सध्या या मार्गावरून ऊस व गवताची वाहतूक चालू आहे. ऊसाच्या ट्रॉल्या व ट्रकने मालाची वाहतुक करताना फांद्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. समोरुन किंवा पाठीमागून एखादे वाहन आल्यास त्याला बाजू देताना मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. काजूचे झाड रस्त्यावर तर वाहनधारक काजूच्या बागेत अशी अवस्था आहे. त्यामुळे संबधीत विभागाने या रस्त्यावर झालेले काजू झाडांचे अतिक्रमण काढण्याची मागणी प्रवाशी व वाहनधारकांनी केली आहे.


1 comment:

Unknown said...

काजू झाडा मुळे अपघात होतात हें काय एकच कारण असू शकत नाही.
आम्ही खूप वेळा त्या रस्त्यांनी प्रवास केला आहे

Post a Comment