![]() |
माणगाव (ता. चंदगड) येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन उपशाखेच्या उद्घाटन प्रसंगी सदस्य. |
कालकुंद्री
/ प्रतिनिधी
तीन
डिसेंबर हा जागतिक दिन जागतिक अपंग दिनाचे औचित साधून चंदगड येथील प्रहार अपंग
क्रांती आंदोलन संघटनेच्या उपशाखेचे उद्घाटन माणगाव (ता. चंदगड) येथे माणकेश्वर
देवालय या ठिकाणी झाले. माणगाव उपशाखेचा शुभारंभ सरपंच सौ. अश्विनी कांबळे, उपसरपंच
बाबू दुकळे यांच्या हस्ते झाले.
प्रमुख
उपस्थिती म्हणून ग्रामविकास अधिकारी एम. बी. दुरूगडे होते. यावेळी ग्रामपंचायत
सदस्य संभाजी कुंभार, कल्पना शिवाजी फडके, इतर सर्व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष
पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक, पंचायत समिती सदस्या सौ. मनीषा अनिल
शिवणगेकर. माजी पंचायत समिती सदस्य अनिल आप्पासो सुरूतकर, पंचक्रोशीतील विविध गावातील अपंग बांधव विधवा परितक्त्या निराधार
महिला व सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी माणगाव येथील प्रहार अपंग
क्रांती आंदोलन संघटनेच्या उपशाखेचे कार्यकारीणी सदस्यांचे स्वागत व प्रमुख
पाहुण्यांचे सन्मानपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी शाखेच्या अध्यक्षपदी
लक्ष्मण बेनके, उपाध्यक्ष नारायण सुतार, सदस्यपदी देवेंद्र बागडी, अमृत होनगेकर, विक्रम
बेनके, कुमारी राजश्री शिवाजी पिटुक, संपर्क प्रमुख अप्पाजी कांबळे, तर
सचिवपदी श्री अनंत कुंभार यांचे निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
प्रकाश चिगरे यांनी केले. अध्यक्ष भाषण सौ. अश्विनी जयवंत कांबळे यांनी करून पुढील
वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी चंदगड प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे
अध्यक्ष जोतिबा गोरल यांनी अपंगांविषयीच्या विविध योजनांचा आढावा दिला. अनिल पाटील
आणि सौ. वंदना बेनके यांनीही मार्गदर्शन मिळाले.
No comments:
Post a Comment