![]() |
चंदगड न्यायालयातील लघुलेखक अरविंद पोडजाळे यांना सेवानिवृत्ती निमित्य शुभेच्छा देताना न्यायाधिश बिराजदार , सह न्यायाधिश गायकवाड , अभियंता बाबूराव उगले व इतर मान्यवर.
|
दिवाणी न्यायालय चंदगड येथील लघुलेखक अरविंद शिवाजी पोडजाळे हे 34 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त्त झाले. न्यायालयाचे न्यायाधिश श्री. बिराजदार यांच्या हस्ते शिवाजी पोडजाळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सह. न्यायाधिश गायकवाड, सरकारी वकिल अॅड. भांदूले, दिलिप कोळी, गोपाळ गुरव, चेतन पाटील, सा. बां. चे अभियंता बाबूराव उगले, आप्पाजी बागे, सुनंदा पोडजाळे, श्रवण कुमार पोडजाळे यांनी मनोगते व्यक्त करून अरविंद पोडजाळे याना शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्ती नंतर व्यक्तीने समाज व कुटूंबासाठी वेळ द्यावा. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी देण्याचे आवाहन न्यायाधिश बिराजदार यांनी यावेळी बोलताना केले. या कार्यक्रमाला न्यायालयातील वकील, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळ गुरव यांनी केले. सूत्रसंचालन श्री. रसाळ यांनी केले तर आभार चेतन पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment