देवरवाडी येथील कुणाल भोगणला गोव्यात कराटेमध्ये रौप्यपदक - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2019

देवरवाडी येथील कुणाल भोगणला गोव्यात कराटेमध्ये रौप्यपदक

कुणाल भोगण
चंदगड / प्रतिनिधी 
देवरवाडी (ता. चंदगड) येथील वैजनाथ विद्यालयाचा विद्यार्थ्यी कुणाल शंकर भोगण याने पणजी गोवा येथे आमंत्रितांच्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्यपदक पटाकावले. कुणाल याने वल्रर्ड कोम्बाट सुपर कराटे असोसिएशनमध्ये कराटे खेळाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याला मुख्याध्यापक एस. जी. शृंगारवाडे, गॅडमास्टर एस. एम. महेंद्र, सुनिता महिंद्रकर, प्रज्ञा महिंद्रकर, प्रणया महिंद्रकर, राजू भोगण यांचे मार्गदर्शन लाभले. देवरवाडी सेवा संस्थेचे अध्यक्ष शंकर भोगण यांचा तो मुलगा असल्याने त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment