विद्यापीठ अनुदान अयोगाच्या अभ्यासक्रमात चंदगडी बोली - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2019

विद्यापीठ अनुदान अयोगाच्या अभ्यासक्रमात चंदगडी बोली

प्रा. डाॅ. नंदकुमार मोरे

चंदगड / प्रतिनिधी
विद्यापीठ अनुदान आयोग (U.G.C.) ही भारतातील विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे. महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावरील प्राध्यापक पदासाठी आणि संशाेधनासाठी ‍दिल्या जाणाऱ्या फेलोशिप्ससाठी विद्यापीठ अनुदान आयाेगाकडून वर्षातून दाेन वेळा नेट परीक्षा घेतली जाते. तर राज्यस्तरावर सेट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी आयाेगाने ‍ 2019 पासून नवीन अभ्यासक्रम जाहीर केला आहे. या अभ्यासक्रमात चंदगडी बोलीचा समावेश करण्यात आला आहे. 
देशपातळीवर झालेल्या भारतीय भाषांच्या लाेकसर्वेक्षणात चंदगडी बोलीवरील दीर्घ नाेंद डॉ. नंदकुमार मोरे यांनी लिहिल्यानंतर या बोलीचा शिक्षण क्षेत्रात प्रवेश सुकर झाला. हा प्रकल्प अलीकडेच अोरिअंट बॅक्सवन या जागतिक दर्जाच्या प्रकाशन संस्थेन इंग्रजी भाषेत अनुवाद करून प्रसिद्ध केला. त्यानंतर जगभरातील विद्यापीठांमध्ये ही बोली भाषा, बाेली आणि संस्कृती अभ्यासासाठी संदर्भग्रंथ म्हणून वापरला जाताे. महाराष्ट्रातील बहुतांश ‍विद्यापीठांनीही हा अभ्यास अभ्यासक्रमात समाविष्ठ केला आहे. शिवाय इयत्ता दहावीच्या मागील अभ्यासक्रमातून चंदगडी बाेली महाराष्टभर परिचित झाली आहेच. मराठी पाठ्यपुस्तक आणि लाेककलांच्या संकलन प्रकल्पाच्या ‍निमित्ताने महाराष्ट्र शासनानेही ही बोली मराठीची अधिकृत बोली असल्याचे  जाहीर केली आहे. आता ही बोेली देशपातळीवरील अभ्यासक्रमात समाविष्ठ झाल्याने चंदगडी बोली ‍अधिकृतपणे उच्चशिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ झाली. या समावेशाबद्दल चंदगडी बोलीभाषकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय यांच्या अखत्यारीत हा आयोग येतो. उच्च शिक्षणाला दिशा देण्याचे कार्य हा आयोग करत असतो.


No comments:

Post a Comment