तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव डी. एड्. कॉलेज तूर्केवाडी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. |
चंदगड / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेचे आयोजन तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव डी. एड्, महाविद्यालयात करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी मुख्याध्यापक टी. एस. सुतार यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष महादेवराव वांद्रे होते.
यावेळी त्यांनी पोस्टर निर्मितीतून सृजनशीलता व निरीक्षण समता विकसित होऊन शिक्षकांना सामाजिक जाणीव जागृती करता येते असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य एन. जी. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना पोस्टर सादरीकरण कौशल्याचे पैलू सांगितले. प्रथम क्रमांक उज्वला कोकाटे गडहिंग्लज, द्वीतीय क्रमांक प्रियांका आत्माराम कांबळे तुर्केवाडी, तृतीय क्रमांक प्रसाद बाळासाहेब सावंत महिपाळगड, चतुर्थ क्रमांक क्लोरीन पीयेदाद सालदान पाटणे, स्नेहल पांडुरंग पाटील शिवनगे यांनी पटकावले. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. व्ही. एस. गावडे, टी. एन. सुतार होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मोहन परब, प्राचार्य एस. एस. झेंडे, मुख्याध्यापक आर. एम. कांबळे, प्राचार्य एम. आर. मुल्ला, व्ही. पी. गुरव, एम. आर. देशपांडे, अमेय वांद्रे, परशराम काजिर्णेकर उपस्थित होते. प्रास्ताविक समन्वयक प्रा. ग. गो. प्रधान यांनी केले. आभार प्रसाद सावंत यांनी मानले. सूत्रसंचालन शैला आढाव यांनी केले. या स्पर्धेसाठी बी. एड् प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment