मौजे जट्टेवाडी येथे पाणंद रस्ता खुला करण्यात यश - चंदगड लाईव्ह न्युज

07 February 2019

मौजे जट्टेवाडी येथे पाणंद रस्ता खुला करण्यात यश

जट्टेवाडी येथे पाणंद रस्ता खुला करताना मंडल अधिकारी राजश्री पचंडी सरपंच प्रा .पी. डी . पाटील ,पो . पाटील सौ पाटील व ग्रामस्थ
तेऊरवाडी / प्रतिनिधी
ग्रामपंचायत जट्टेवाडी (ता. चंदगड) अंतर्गत मौजे जट्टेवाडी येथे मंडल अधिकारी राजश्री पचंडी यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास दोन किमी पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता वहातूकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी सरपंच प्रा. पी. डी. पाटील, उपसरपंच नारायण पाटील, पोलिस पाटील सौ. अश्विनी पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ पाटील, सदस्य गोविंद पाटील, वर्षा पाटील, वैशाली पाटील, कविता पाटील, अशोक बुवा आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment