सुरज पाटील, मारूती पाटील, सायली आपटेकर |
अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजच्या सुरज पाटील, मारूती पाटील, सायली आपटेकर या तीन विद्यार्थ्यIनी एन. एम. एम. एस. परीक्षेत उज्वल यश संपादन करून प्रत्येकी 48 हजार रुपयांच्या राष्ट्रीय शिष्यवृत्तीस पात्र ठरले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पूणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. परीक्षेत सुरज बाळकृष्ण पाटील, मारूती शंकर पाटील व सायली पुंडलिक पाटील हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरले. यशस्वी विद्यार्थाना मुख्याध्यापक डी. जी. कांबळे, पर्यवेक्षक एस. जी. पाटील, एस. एन. पाडले, महेश गुरव आदिंचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment