देवरवाडी येथे शिवजयंती निमित्त पुस्तकांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2019

देवरवाडी येथे शिवजयंती निमित्त पुस्तकांचे वाटप


चंदगड / प्रतिनिधी
देवरवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सकाळी गावातून प्रभात फेरी काढली. या विद्यार्थ्यांना मोरया ग्रुप  मार्फत विद्यार्थ्यांना शिवाजी कोण होता, हे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तके वाटप करण्यात आली. संघर्ष प्रज्ञावंत, गणपत भोगण, आकाश भोगण, संभाजी केसरकर, विनायक कांबळे, सोमेश मजुकर, सागर शिंदोळकर, कृष्णा आंदोचे, नरसिंग कांबळे या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी मूख्याघ्यापक व शिक्षक  उपस्थित होते.



No comments:

Post a Comment