चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2019

चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी

नांदवडे (ता. चंदगड) येथे शिवजयंतीनिमित्त बालचमूंनी सायकलला झेंडे लावून गावातून फेरी काढली. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती उत्साहात साजरी करण्यात आली. अवघा तालुका भगवामय झाला होता. तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायतीमध्ये शिवजयंती साजरी करण्या बरोबरच तरूण मंडळानीही स्वतंत्रपणे शिवजयंती साजरी केली. तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पहाटे तालुक्यातील पारगड, गंधर्वगड, महिपाळगड व कलानंदीगडावरून शिवज्योत आणली. गावागावात भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत. शिवप्रतिमेची मिरवणुक काढली. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात  शिवव्याख्याते प्रा. मधूकर जाधव यांचे व्याख्यान झाले. अनेक गावातही शिवव्याख्यान्यांचे आयोजन करण्यात आले होेते. शिनोळी, नरेवाडी येधे नविन अश्वरूढ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तुडये येथे कूस्त्याचे मैदान आयोजन करण्यात आले. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अवघा तालूका भगवामय झाला होता.

No comments:

Post a Comment