चंदगडचे ग्रामदैवत रवळनाथ यात्रेला बुधवारपासून प्रारंभ, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2019

चंदगडचे ग्रामदैवत रवळनाथ यात्रेला बुधवारपासून प्रारंभ, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामदैवत श्री रवळनाथ
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्याच्या ठिकाणचे ग्रामदैवत व 84 खेड्यांचे श्रध्दास्थान असलेल्या चंदगड येथील श्री देव रवळनाथ यात्रेला बुधवारी (ता. 20) पासून प्रारंभ होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेची सांगता 24 फेब्रुवारी 2018 रोजी होईल.
श्री देव रवळनाथ हे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यांसह इतर राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यावेळी नोकरीनिमित्त बाहेर गावी असलेले चाकरमनी, माहेरवासिनी गावात दाखल होतात. येथील 84 खेड्यांचे आराध्य दैवत देव रवळनाथाची यात्रा बुधवार दि. 20 रोजी प्रारंभ होणार असून दुपारी 3.30 वाजता महाआरती व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 21 रोजी चाळोबा यात्रा व रात्री 9 वाजता आरती होणार आहे. तर शुक्रवार दि. 22 रोजी सातेरी, भावेश्वरी यात्रा होणार आहे. सकाळी 7.30 वाजता अभिषेक व रात्री 8.30 वाजता आरती होणार आहे. शनिवार दि. 23 रोजी ईटलाई यात्रा होणार आहे. रविवार दि. 24 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 1 पर्यंत देव रवळनाथाला अभिषेक व दुपारी महानैवेद्य व रात्री 11 वाजता पालखीनंतर आरती व प्रसाद होणार आहे. त्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे.


No comments:

Post a Comment