चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगर पंचायतीसाठी प्रभाग रचना काम पूर्ण झाले आहे. नगर पंचायत समितीच्या सदस्यांसाठी आरक्षण संदर्भात सोडतीचा कार्यक्रम गुरुवारी 21 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3 वाजता उप विभागीय अधिकारी श्रीमती विजया पांगारकर यांच्या अघ्यक्षतेखाली चंदगड प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे. असे जिल्हा अधिकारी दौलत देसाई यांनी काढललेल्या आदेशानुसार चंदगड तहसीलदार कार्यालयातून प्रसिद्धीसाठी दिले आहे. यासंदर्भात काही सुचना व हरकती असल्यास 26 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 पर्यंत सुट्टी वगळून कार्यालय वेळेत नगरपंचायत कार्यालयात स्विकारल्या जातील असे प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकातून कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment