दौलत कारखाना चालवण्यास तालुका संघ तयार असेल तर आमचे सहकार्य राहील - संग्राम कुपेकर - चंदगड लाईव्ह न्युज

18 February 2019

दौलत कारखाना चालवण्यास तालुका संघ तयार असेल तर आमचे सहकार्य राहील - संग्राम कुपेकर

संग्राम कुपेकर
चंदगड / प्रतिनिधी 
गेली अनेक वर्षे दौलत सहकारी साखर कारखाना हा बंद अवस्थेत असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी कामगार व वाहतूकदार अडचणीत आले आहेत. सद्यस्थितीमध्ये दौलत कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. दौलत कारखाना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दौलतच्या संचालक मंडळामध्ये माझे वडील भैयासाहेब कुपेकर यांनी संचालक म्हणून पाच वर्षे काम केले आहे. माझे छोटे काका बाळासाहेब कुपेकर कारखान्याचे यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे आमच्या व शेतकऱ्यांच्या भावना दौलत कारखान्याची जोडल्या गेल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने नवीन निविदा प्रसिद्ध केल्यानंतर चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजेश पाटील यांनी दौलत कारखाना चालवण्याकरिता निविदा भरली आहे. संघाचे चेअरमन राजेश पाटील तालुका संघाच्या माध्यमातून दौलत कारखाना चालवण्यासाठी घेत असतील तर त्यांना आमचे सहकार्य राहील असे प्रसिध्दीपत्रक शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर यांनी प्रसिद्दीला दिले आहे. 

No comments:

Post a Comment