चंदगड येथे नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त बोलताना खासदार उदयनराजे भोसले. शेजारी संग्राम कुपेकर, डाॅ. प्रकाश बांदिवडेकर व कलाकार मंडळी. |
चंदगड / प्रतिनिधी
लोक आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात. त्यावेळी लोकांच्या लोकप्रतिनिधीच्याकडून आपल्या भागाचा विकास व्हावा अशी अपेक्षा असते. जे लोक आपल्या भागाचा चांगल्या पध्दतीने विकास करतात. त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज आहे. जोपर्यंत या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. तोपर्यंत या तालुक्याची प्रगती होणार नाही. माझा नागरी सत्कार करण्यापेक्षा तालुक्याच्या विकासाला गती देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करणे गरजेचे असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. चंदगड येथे डॉ. प्रकाश बांदिवडेकर फौंडेशन व चंदगड तालुक्याच्या वतीने नागरी सत्काराच्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संध्यादेवी कुपेकर होत्या.
प्रारंभी वीरपत्नी, वीरमाता यांचा सत्कार करण्यात आला. गरजु महिलांना साड्या, अपंगाना व्हील चेअर व चष्मे वाटपाचा कार्यक्रम झाला. डॉ. प्रकाश बांदिवडेकर यांचा वाढदिवसानिमित्त खासदार श्री. भोसले यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रास्ताविक ॲड. रामचंद्र बांदिवडेकर यांनी केले. आमदार संध्यादेवी कुपेकर व माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या वतीने खासदार उदयनराजे यांचा सत्कार चांदीची तलवार देवून करण्यात आला. यावेळी कलाकार मंडळींनी आपली कला सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
खासदार श्री. भोसले म्हणाले, `` निवडणुका आल्या की बेबीच्या देटापासून लोकांना सांगत असतात. त्यांचे वागणे व बोलणे पाहून तळागाळातील लोकांना वाटते की काम करेल ते हेच. निवडणुक जिंकल्यानंतर मात्र ज्या तळागाळातील लोकांना निवडून दिले. त्यांचा विसर पडतो हि वस्तुस्थिती आहे. विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता. त्यावेळी एवढी स्पर्धा नव्हती. त्यावेळच्या राजकारण्यांचा एक सामाजिक दृष्टीकोन होता. प्रथम समाज व मन आपण. आता मात्र हे चित्र बदलले आहे. प्रत्येकजण मीपणाने वागतो, हे चुकीचे आहे. प्रत्येक माणूस व्यक्तीकेंद्रात झाला आहे. त्यामुळे हि बाब देशासाठी घातक आहे. ज्या समाजात आपण वावरतो. त्या समाजाचे आपण काहीतरी देणे आहे. तो समाज प्रगतीपथावर नेण्याची आपण झटले पाहिजे, तरच या देशात राष्ट्रभक्ती व राष्टप्रेम अबाधित राहील. मतदार हा लोकशाहीतील राजा आहे. त्यांची सेवा करणे माझे कर्तव्य आहे. मी ज्या घराण्यात जन्माला आलो, त्या घराण्याचा वारसा मोठा आहे. त्या उंचीपर्यंत पोहोचविण्यासाठी अजून भरपूर अवकाश आहे. मात्र निश्चितपणे ती उंची काढणार आहे.`` यावेळी संग्राम कुपेकर, राजेंद्र यादव, श्रीधर शिंदे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
No comments:
Post a Comment