मुक्या प्राण्याविषयी कणव असणारी अलबादेवीची निधी कोले - चंदगड लाईव्ह न्युज

18 February 2019

मुक्या प्राण्याविषयी कणव असणारी अलबादेवीची निधी कोले

संतोष सुतार / दौलत हलकर्णी
मुक्या प्राण्याविषयी कणव असणाऱ्या एका वेगळ्याच मुलीची चर्चा सद्या अलबादेवी (ता. चंदगड ) परीसरात ऐकायला मिळते. गावात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना आपल्या घरी आणुन त्यांना आंघोळ घालुण त्यांचे संगोपण करण्याचा वेगळाच ध्यास निधी प्रकाश कोले या मुलीने घेतला आहे. ह्या अशा वेगळ्याच ध्यासाबद्दल समजातुन वेगळ्याच नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. पण तिने या कडे आजिबात लक्ष्य दिले नाही. आज जवळपास ९ भटकी कुत्र्यांचे संगोपण ती करते. कुमारी निधी प्रकाश कोले उच्चविद्याभूषित मुंबई येथे नावाजलेल्या कॉलेज मधून नुकतीच पदवी संपादन करून एमपीएसस्सीचा अभ्यासक्रम करण्यासाठी गावी अलबादेवी (ता  चंदगड) येथे  आली आहे.
वडील प्रकाश कोले हे लहान पणीच पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई या मायानगरी येथे दाखल झाले सुरवातीला मिळेल ते काम करून आणि नंतर एका खासगी कंपनी मध्ये सुमारे 22 वर्षे एकाच ठिकाणी नोकरी करून आपला उदरनिर्वाह चालू ठेवला. पदरात प्रतिक व निधी ही दोन मुले.
हे करत असताना मुंबई मध्ये आपले स्वतःचे घर असावे ही प्रत्येक माणसाचे स्वप्न असते त्यामुळे त्यांनी दिवसरात्र एक करून ते एकदाचे पूर्ण केले. संसारात तारेवरची कसरत करत त्यांच्या पत्नीने त्यांना तितकीच मदत केली. पण हे करत असताना मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी कसलीही तडजोड केली नाही,केवळ शिक्षण ही महत्त्वाचे नाही तर मुलांच्यावर संस्कार ही तितकेच महत्वाचे असतात त्यामुळे दोन्ही मुलावर चांगले संस्कार त्यांनी केले. हे मुलाच्या कृतीतून दिसते. आज मुलगा आय टी कपंणीत नौकरी करतो, तर मुलगी mpsc चा अभ्यास करते.
आज निधी कोले यांच्या घरी 9 कुत्री आहेत कुत्री सर्वांच्या घरी असतात पण भटकी ,उपाशी, कुत्र्यांना घरी आणून त्याला आंघोळ घालून पोटभर जेवण घालून त्यांना झोपायला स्वतःची गादी देणं हे आत्ता नित्याची बाब झाली आहे.हे करत असताना गावातील ग्रामस्थांचा तिला विरोध झाला.  हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, समाज काय म्हणेन या विवंचनेत न  राहता  तिने आपले कार्य चालूच ठेवले, कारण मोठया व खोट्या प्रतिष्टेसाठी आपल्या श्रीमंतीचा  बडेजाव करणारी काही मंडळी आपल्या समजण्यात वावरताना दिसतात. हे तिला बदलण्याची सुरवात करायची होती. परवा तर आपण मुंबई ला गेल्यानंतर त्या भटक्या कुत्रीचे व तिच्या पिल्लांचे हिच्या सारखे हाल होऊ नये यासाठी त्या भटक्या मादी कुत्र्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी बेळगाव येथील डॉक्टरकडे दोन वेळा त्या कुत्री ला स्पेशल गाडी करून  जाऊन आली.पण डॉक्टर नसल्यामुळे परत आली पण निराश झाली नाही ही गोष्ट डॉक्टर ला समजल्यानंतर  सदर डॉक्टर महाशय मुक्या प्राण्यावरचे प्रेम पाहून  भारावून जाऊन तिला शोधत गावाकडे येऊन त्या कुत्रीवर शस्त्रक्रिया केली.आजही तिच्या घरी कुत्री, मांजरांसाठी  लागणारी प्राथमिक औषधे तिच्या कडे भरपूर प्रमाणात आहेत.
घरींची परिस्थिती जेमतेम असताना मुक्या प्राण्यांना आपल्या ताटातील घास भरवुन त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे हे तिच्या कृतीतून दिसून येते, एव्हाना माझं आहे ते माझेंच आहे आणि तुझे आहे ते  देखील  माझेंच आहे असे म्हणणाऱ्या लोकांसाठी ही बाब निश्चितच डोळ्यात अंजन घालणारी आहे. अश्या अनेक शेकडोच्या वर  भटक्या कुत्र्यांना,मांजरे यांना पोटभर जेवण,त्यांच्यावर स्वखर्चाने उपचार करून जीवनदान दिले आहे.माणूस हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धीवान प्राणी हे अनेक वेळा सर्वांच्या वाचनात आले आहे पण निसर्गाने देखील सर्वाना जगण्याचा  समान अधिकार हे आहे सुद्धा अनेक वेळा निसर्गानेच आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे हे ही नसे थोडके.


No comments:

Post a Comment