![]() |
| चेतन शेरेगार संजय चंदगडकर अमेय सबनीस |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारत नगराध्यक्षपदासह सत्तांतर घडवून आणले. यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदासह व उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता चंदगडकरांना लागून आहे.
चंदगड नगरपंचायत मध्ये बुधवारी 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 पासून नगरपंचायत सभागृहात स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष निवड प्रक्रिया होईल. गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयात स्वीकृत नगरसेवक साठी भारतीय जनता पक्षाकडून चेतन शेरेगार व चंदगड भाजपचे चंदगड शहराध्यक्ष अमेय सबनीस यांनी अर्ज दाखल केला आहे. तर विरोधी राजश्री शाहू विकास आघाडी यांच्याकडून संजय चंदगडकर यांनि अर्ज दाखल केला आहे. नियमानुसार आणि सभागृहातील संख्याबळानुसार सत्ताधारी भाजप गटाला एक स्वीकृत नगरसेवक व विरोधी राजर्षी शाहू विकास आघाडी ला एक स्वीकृत नगरसेवक पद मिळणार आहे. यादरम्यान भाजपकडून दोघांचे अर्ज दाखल झाल्याने या स्वीकृत नगरसेवकांच्या पद कुणाच्या गळ्यात पडणार तसेच उपनगराध्यक्ष पदी कोणाची निवड होणार, याकडे संपूर्ण चंदगडकरांचे लक्ष लागून आहे. स्वीकृत नगरसेवकांची नावे नगराध्यक्ष सुनील काणेकर हे जाहीर करतील. या निवडीबाबत ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

No comments:
Post a Comment