जांबरे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत झांबरे ग्रामपंचायतीच्या वतीने अनुदानावर बंब वितरित - सरपंच विष्णु गावडे - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2026

जांबरे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत झांबरे ग्रामपंचायतीच्या वतीने अनुदानावर बंब वितरित - सरपंच विष्णु गावडे

 

जांबरे (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना बंद वितरीत करताना सरपंच विष्णु गावडे, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती तालुकाध्यक्ष लक्ष्मण विश्राम गावडे, वनपाल कृष्णा डेळेकर व इतर मान्यवर.   

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत झांबरे ग्रामपंचायतीच्या वतीने लोकसहभागातून आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी कमी लाकडामध्ये, लाकडाची बचत करण्याकरिता बंब वितरित करण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती तालुकाध्यक्ष लक्ष्मण विश्राम गावडे यांच्या हस्ते हे बंब ग्रामस्थांना वितरीत करण्यात आले. 

    यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुरेश ठोंबरे, ग्लोबल मराठा रणरागिणी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष धन्वंतरी देसाई, वाईल्ड लाईफ कंजर्वेशन ट्रस्ट संचालक गिरीश परदेशी, जांबरेचे सरपंच विष्णू गावडे, ग्रामसेवक अश्विनी कुंभार, वनपाल कृष्णा डेळेकर, वनरक्षक श्री. सनदी, कृषी सहाय्यक श्री. साबळे, मुख्याध्यापक श्री. पेडणेकर, स्टाफ व जांबरे ग्रामस्थ, महिला मंडळ व तरुण कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

    या कार्यक्रमासाठी ``वाईल्ड लाईफ कन्सर्वेशन ट्रस्ट "यांचे संचालक गिरीश पंजाबी यांचे सहकार्य लाभले. यामधूनच झाडे लावा आणि जंगल वाचवा या संकल्पनेतून या बंबाचे वितरण करण्यात आले. असेच अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून झांबरे ग्रामपंचायत अग्रेसर ठरत आहे. 


No comments:

Post a Comment