चंदगड नगरपंचायत : उपनगराध्यक्षपदी आयेशा नाईकवाडी, स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे अमेय सबनीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय चंदगडकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2026

चंदगड नगरपंचायत : उपनगराध्यक्षपदी आयेशा नाईकवाडी, स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे अमेय सबनीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय चंदगडकर यांची निवड

आयेशा नाईकवाडी


अमेय सबनीस                                  संजय चंदगडकर


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

    अनेक दिवसापासून चंदगडकरांना उत्सुकता लागून असलेल्या चंदगड नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी आयेशा समीर नायकवाडी यांची उपनगराध्यक्षपदी तर स्वीकृत नगरसेवकपदी भारतीय जनता पक्षाकडून अमेय सबनीस यांची तर विरोधी राजर्षी शाहू विकास आघाडीकडून संजय चंदगडकर यांची वर्णी लागली.

    बुधवारी (दि. ७) चंदगड नगरपंचायत सभागृहात नूतन कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील काणेकर होते.

    स्वीकृत नगरसेवक पदासाठी चंदगड भाजपचे चंदगड शहराध्यक्ष अमेय सबनीस व चेतन शेरेगार या दोघांनी अर्ज दाखल केले होते. मात्र चेतन शरेगार यांनी सदर अर्ज माघार घेतला. यानंतर स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आली. तर उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडूनच दोन अर्ज दाखल केले होते. आयेशा समीर नायकवडी  व अबुजर अब्दुलरहीम मदार या दोघांचे अर्ज दाखल झाले होते. मात्र अबुजर मदार यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने उपनगराध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाली.

    निवडी नंतर आमदार शिवाजी पाटील, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती शांताराम पाटील, नामदेव पाटील, रवी बांदिवडेकर, भाजप तालुकाध्यक्ष विशाल बल्लाळ, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे, एड. विजय कडुकर, दिग्विजय देसाई, अनिल शिवनगेकर, सुरेश सातवणेकर, सचिन बल्लाळ, अरुण पिळणकर, श्रीशैल नागराळ आदी मान्यवर उपस्थित होते.

    पहिल्याच बैठकीला सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अबुजर मदार, शितल कट्टी, सुचिता कुंभार, माधवी शेलार, गायत्री बल्लाळ, एकता दड्डीकर सचिन सातवणेकर, तर विरोधी राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगरसेवक सुधा गुरबे, सुधीर पिळणकर, सिकंदर नाईक, नवीद अत्तार, प्रमोद कांबळे, जयश्री वणकुंद्रे, सुभाष गावडे, सानिया आगा यांच्यासह अजिंक्य पिळणकर उपस्थित होते.

   यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे, प्रशासकीय अधिकारी स्वप्निल रानगे, प्रशासकीय अधिकारी निहाल नाईकवाडे, जलअभियंता धनंजय देसाई, नगर लेखापाल आतिष काटकर, अभियंता अमित जाधव यांच्यासह सर्व नगरपंचायत कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. 

No comments:

Post a Comment