गुरुकुल रोखठोक भाषण स्पर्धेत ॲड. संतोष मळविकर, सुनिल शिंत्रे, विजयकुमार दळवी यांची बाजी - चंदगड लाईव्ह न्युज

18 February 2019

गुरुकुल रोखठोक भाषण स्पर्धेत ॲड. संतोष मळविकर, सुनिल शिंत्रे, विजयकुमार दळवी यांची बाजी

चंदगड येथे गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित रोखठोक भाषण स्पर्धेतील विजेते व इतर मान्यवर.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यासाठी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींसाठी गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या रोजी रोखठोक भाषण स्पर्धेत ॲड. संतोष मळविकर यांनी प्रथम, सुनिल शिंत्रे यांनी द्वीतीय, विजयकुमार दळवी यांनी तृतीय तर  विद्या तावडे आणि विठ्ठल पेडणेकर यांनी उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले. या स्पर्धेमध्ये 17 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उदघाटन चंदगड विधानसभा आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी रोजगार हमी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील होते. यावेळी डॉ. नंदिनीताई बाभूळकर व रामराजे कुपेकर प्रमुख उपस्थित होते. 

प्रारंभी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष ॲड. रवि रेडेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. या स्पर्धेत नितीन पाटील, विठ्ठल पेडणेकर, सुनिल काणेकर,  एम. जे. पाटील, स्वप्नाली गवस, ॲड. संतोष मळविकर, विजयकुमार दळवी, रामभाऊ पारसे,  विद्या तावडे, पी. आर. माडेकर, प्रा. अमृत पाटील, एकनाथ कांबळे, नागेश चौगुले, बाबूराव हळदणकर, अशोक पेडणेकर, सुनिल शिंत्रे, दयानंद काणेकर आदींनी स्पर्धेत भाग घेतला होता. सर्व विजयी व सहभागी स्पर्धकांचा या वेळी सन्मानाचा चंदगडी फेटा, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आले. परिक्षक म्हणून ॲड. संदीप फगरे, डॉ. दिपक पाटील, प्रा. एम. व्ही. कानूरकर, पत्रकार संपत पाटील, अवधूत भोसले, चंद्रकांत पाटील, बाबाजी पाटील व वैष्णवी सुतार यांनी काम पाहिले. यावेळी सर्व सन्माननिय पत्रकार व परिक्षकांचाही सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. ॲड. रवि रेडेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. 


No comments:

Post a Comment