दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
शिवणगे (ता. चंदगड) येथील कु. आराध्या संतोष शिवणगेकर (वय-३ वर्ष) हिला काही अज्ञात भुरट्यांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी याबाबतचे निवेदन चंदगड तालुका भाजपा उपाध्यक्ष संदिप नांदवडेकर यांनी चंदगड पोलीस निरीक्षक एस. एम. यादव यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवार १६ फेब्रवारी 2019 रोजी कु. आराध्या संतोष शिवणगेकर ही सायंकाळी ६ ते ७ बाजण्याच्या दरम्यान शिवणगे येथील श्री ताम्रपर्णी विद्यालय येथील परिसरात खेळत असताना अचानक ३ अज्ञात इसम मोटरसायकल वरून आले व परिसरातील अंदाज पाहुन कु.आराध्या हीला अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्यासोबत असणाऱ्या कु. राणी संजय सुतार या आठ वर्षीय मुलीने आरडाओरडा केला. मुलीच्या आवाजाने गावकरी आवाजाच्या दिशेने धावत आले. त्यामुळे भुरट्यांचा अपहरण करण्यास अयशस्वी ठरले. गावकर्यांनी भुरट्यांचा पाठलाग केला, पण ते मोटरसायकलवरून पसार झाले. यापुढे असा अनुचित प्रकार यापुढे घडु नये व या अशा भुरट्यांचा तात्काळ तपास करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे निवेदन पोलिसांना दिले आहे. निवेदनावर आराध्याचे वडील संतोष शिवणगेकर, राजू पाटील, प्रविण सुर्यवंशी, भुषण पाटील, फिरोज मुल्ला, टि. बी. पाटील, आर. पी. डुरे, पी. जी. धुरी, एन. आर. सुतार, डी. आर. भोई, समीर पाटील, अनिल पाटील, रणजित पाटील, सचिन पाटील, विशाल पाटील, प्रमोद पाटील आदिंच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment