सोनोलीजवळ तुडयेच्या दुचाकीचालकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2026

सोनोलीजवळ तुडयेच्या दुचाकीचालकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू

तुकाराम विठ्ठल गुरव

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

     शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात मूळचा तुडये व सध्या सोनोली (ता. बेळगाव) येथील रहिवासी असणाऱ्या तरुण दुचाकीचालकाचा सोनोली जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या घटनेने तुडये परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

   तो सोनोली येथे दोन वर्षांपासून वास्तव्य करत होता. तुकाराम विठ्ठल गुरव (वय ३४) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

   शुक्रवारी रात्री काही व्हाट्सअप ग्रुप वरील मेसेज मुळे त्यांच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती मिळाली. यानंतर पुढील उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात आले होते. बेळगाव येथील वडगाव पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

 तुकाराम हा शेती तसेच जोडधंदा म्हणून ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. शुक्रवारी तो तुडये येथून आपले काम संपून सोनोली येथे आपल्या घरी निघाला होता. दरम्यान अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या तो जागीच गतप्राण झाला. त्याच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले

 त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. पाटबंधारे खात्याचे निवृत्त चालक व तुडये येथील रहिवासी रामलिंग गुरव तर बेळगाव येथील रहिवासी सीए महादेव गुरव यांचा तो पुतण्या होय.

No comments:

Post a Comment