![]() |
| संजय कांबळे |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
पार्ले (ता. चंदगड) येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते व पार्ले ग्रामपंचायतचे क्लार्क संजय दत्तू कांबळे (वय ४८) यांचे शनिवारी दि. ३ जानेवारी २०२६ रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे. ते चंदगड तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी तसेच शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. त्यांच्या निधनामुळे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते बहुजन समाज क्रांती संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते.

No comments:
Post a Comment