हुमानिग्रस्त शेतकऱ्यांना किणी येथे मौलीक मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2019

हुमानिग्रस्त शेतकऱ्यांना किणी येथे मौलीक मार्गदर्शन

किणी (ता. चंदगड) येथे ओलम अॅग्रोच्या (हेमरस) वतीने हुमनीग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना किटकशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग मोहिते. बाजुला शेतकरी. 
कोवाड / प्रतिनिधी
राजगोळी खुर्द येथील हेमरस (ओलम) साखर कारखान्यातर्फे किणी (ता. चंदगड) येथे उपक्रमशील शेतकरी संजय कुट्रे यांच्या मळवी नावाच्या ऊस शेतात हुमणी निवारण प्रात्यक्षिक दाखवत कोल्हापूर येथील  किटकशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग मोहिते यांनी अनमोल मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्षात उसामध्ये पडलेल्या हुमणीची पाहणी करून त्या हुमणीचा बंदोबस्त कसा करायचा याचे प्रात्यक्षिक भागातून आलेल्या शेतकऱ्यांना दाखविले. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचेही त्यांनी निरसन केले. यावेळी हेमरसचे शेती अधिकारी सुधीर पाटील,  नामदेव पाटील, संजय पाटील, ओलम ऍग्रो मध्यप्रदेश येथील साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते. श्री अष्टविनायक शेतकरी (आत्मा) गटाचे  सर्व सदस्य मारुती मोटुरे, संजय गवंडी, प्रकाश पूजारी, शाहू फर्नाडिस, विलास बसरगेकर (तुर्केवाडी), सुबराव पाटील, मारुती गवंडी, श्रीकांत मुंगेरी (राजगोळी), प्रल्हाद बिर्जे, महादेव  पाटील, बाबू पाटील, बबन तरवाळ,  बंडू बिर्जे तसेच पंचक्रोशीतील हुमानिग्रस्त शेतकरी यावेळी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment