सिद्धार्थ देसाई |
हुंदळेवाडी (ता. चंदगड) गावचा सुपुत्र व गतहंगामातील यु-मुंम्बाचा आघाडीचा खेळाडू सिद्धार्थ देसाईला प्रो-कबड्डी लीगच्या सातव्या मोसमात तेलगु टायटनने लिलाव प्रक्रियेत 1 कोटी 45 लाखाला खरेदी केले. सिद्धार्थची दुरदर्शनवर लिलावाची बातमी पाहुन गावकऱ्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला. सिद्धार्थच्या निवडीमुळे चंदगड तालुक्याच्या क्रीडाक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कबड्डीतील एक अटीतटीचा क्षण. |
प्रो-कबड्डीचा सातव्या हंगामाचा लिलाव सोमवारी (ता. 8) मुंबईत सुरू झाला. `अ` श्रेणीतील सिद्धार्थवर लिलाव प्रक्रियेत कोट्यावधींची बोली सुरू झाली. अखेर तेलगु टायटनने सिद्धार्थला 1 कोटी 45 लाखाची विक्रमी बोली लावून आपल्या संघात घेतले. सोमवारी (ता. 8) झालेल्या प्रक्रियेत सर्वात जास्त बोली लावलेला हा एकमेव होता. सिद्धार्थवर विक्रमी बोली लावल्याचे समजताच चंदगड तालुक्यात गावोगावी तरुणांनी आनंद साजरा केला. सोशल मिडियावर सिद्धार्थचे फोटो झळकू लागले. अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. प्रो कबड्डीच्या पहिल्याच गत हंगामात यु मुंम्बाकडून खेळताना सिद्धार्थने सर्वांचे लक्ष वेधले होते. आक्रमक चढाईने विरोधी संघातील खेळाडूंच्या धडकी निर्माण केली होती. चढाई बरोबर सिद्धार्थने पकडीतही कौशल्य दाखवले होते. 11 सुपर टेनसह 214 गुणांची कमाई करून सिद्धार्थने प्रो-कबड्डी तील आपले सिद्धता सिद्ध केली. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रसार माध्यमांनी सिद्धार्थची दखल घेतली होती. आपल्या शांत व संयमी खेळामुळे सिद्धार्थने सर्वांचे लक्ष वेधले होते. सिद्धार्थचे वडील शिरीष देसाई यांनी निवडीबद्दल आनंद व्यक्त करून प्रो-कबड्डीतून तो देशाचे नाव उंचावेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
2 comments:
Congratulations Siddu👏👏👏
Laibhari chandgad chi shan
Post a Comment