हेमरसकडून हंगामातील एफआरपी जमा : कुंडल, जिल्ह्यात सर्वप्रथम बिले दिल्याचा दावा - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2019

हेमरसकडून हंगामातील एफआरपी जमा : कुंडल, जिल्ह्यात सर्वप्रथम बिले दिल्याचा दावा

भरत कुंडल
कोवाड / प्रतिनिधी
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली.
यावेळी श्री. कुंडल म्हणाले, ``कोल्हापूर जिल्ह्यात सर्व प्रथम ओलमने (हेमरस) एफआरपीप्रमाणे बिले आदा करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. गळीत हंगामाच्या सुरुवातीला कारखानदारांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रतिटन 2300 रुपयांच्या पहिल्या पंधरवड्यातील ऊसाचा हप्ता काढला होता. पण त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून कारखाना प्रशासनाने प्रति टन 2920 इतकी एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. चालू वर्षी कारखान्याचा गळीत हंगाम 132 दिवस चालला. यामध्ये 6 लाख 50 हजार 718 टन उसाचे गाळप झाले. या गाळपासून 8 लाख 34 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. शेतकऱ्यांनी ओलमवर विश्वास दाखवत जास्तीत-जास्त उसाचा पुरवठा केल्याने कारखान्याने 6 लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला. ओलमने पारदर्शक कारभाराचा मंत्र जपला आहे. चालू वर्षी एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी कारखानदारांच्याकडे मागणी आहे. पण जिल्ह्यात सर्वात प्रथम हेमरसने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या या मागणीचा विचार करून गाळप झालेल्या ऊसाची एफआरपी तात्काळ एकरकमी आदा केली आहे. 


No comments:

Post a Comment