तेऊरवाडी / प्रतिनिधी
सट्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी चंदगड तालुका माध्यमिक शिक्षक संघटना व मराठी अध्यापक संघ चंदगड यांच्या वतीने सुंदर हस्ताक्षर छंदवर्गाचे 10 ते 20 एप्रिल 2019 या कालावधीत आयोजन केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून चालत असलेल्या या शिबिराच्या माध्यमातून आजवर अनेक विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर झाले आहेत. इयत्ता तिसरीपासून पुढील सर्वांसाठी प्रवेश देण्यात येईल. दुपारी 4 ते 5.30 या कालावधीत कार्वे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालयात आयोजन केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी दुरेघी 200 पानी वही , जेल पेन किंवा शाईचे पेन आणणे आवश्यक आहे. या वर्षीही या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सुभाष बेळगांवकर व संजय साबळे यांनी संघटनेच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment